कर्तव्य बजावतांना कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यु झालेल्या अंगणवाडी सेविकेचे वारसास 50 लाख रुपयांचा

कर्तव्य बजावतांना कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यु झालेल्या अंगणवाडी
सेविकेचे वारसास 50 लाख रुपयांचा विमा कवच प्रदान

गडचिरोली, दि.09: एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प आरमोरी अंतर्गत अंगणवाडी केन्द्र क्रमांक २७५०८०२०११ येथील अंगणवाडी सेविका श्रीमती तारा किसन मेश्राम हया कोरोना साथीच्या कालावधीत कोरोना सर्वे कर्तव्य बजावत असतांना कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यु झाला. शासन निर्णयानुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आरमोरी व जिल्हा परिषद गडचिरोली प्रशासनाकडून आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, मुंबई यांचेकडे विमा कवच योजना प्रस्ताव सादर करण्यात आला होता. विमा कवच योजनेअंतर्गत मंजुर सानुग्रह अनुदान रुपये ५०.०० लक्ष, दिनांक 07 नोव्हेंबर 2023 रोजी कोरोना योध्दाचे वारसदार पती किसन लाकडु मेश्राम यांना सदरील धनादेश मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.गडचिरोली, श्रीमती आयुषी सिंह यांचे हस्ते वितरीत करण्यात आला यावेळी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.गडचिरोली राजेन्द्र भुयार, तसेच श्रीमती अर्चना इंगोले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.). जि.प. गडचिरोली व बाल विकास प्रकल्प अधिकारी, आरमोरी, जी.एल. कुकडे हे उपस्थित होते.