भंडारा : ऑलिंम्पिक खेळाडूंना शुभेच्छा देण्याकरिता जिल्ह्यात विविध ठिकाणी सेल्फी पाँईंट

ऑलिंम्पिक खेळाडूंना शुभेच्छा देण्याकरिता

जिल्ह्यात विविध ठिकाणी सेल्फी पाँईंट

भंडारा, दि.23:- जपान मधिल टोकिओ शहरात आयोजित ऑलिंम्पिक स्पर्धेत विविध खेळांच्या स्पर्धेसाठी भारताचे 126 खेळाडू प्रतिनिधीत्व करीत आहे. विविध अशा 18 खेळांमध्ये 126 भारतीय खेळाडू सहभाग घेणार असून त्यापैकी महाराष्ट्रातील 10 खेळाडू सुध्दा सहभागी आहे. या स्पर्धेतील खेळाडूंना शुभेच्छा प्रदान करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी सेल्फी पाँईंट तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सेल्फी पाँईंटचे उद्घाटन जिल्हाधिकारी संदीप कदम यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, क्रीडा अधिकारी मनोज पंधराम, राज्य क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी व राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू उपस्थित होते.

            ऑलिंम्पिक मध्ये विविध क्रीडा प्रकारामध्ये महाराष्ट्रातील राही सरनोबत-शुटींग, तेजस्विनी सावंत-शुटींग, प्रवीण जाधव-आर्चरी, अविनाश साबळे-ॲथेलेटिक्स, चिराग शेट्टी-बॅटमिंटन, विष्णू सरवानन-सेलिंग, उदयन माने-गोल्फ, स्वरूप उन्हाळकर-पॅरा शुटींग, सुषश जाधव-पॅरा जलतरण, भाग्यश्री जाधव-पॅरा ॲथलेटिक्स हे खेळाडू सहभागी झालेले आहेत.