5 राज्यातील पराभवाच्या नामुष्कीतुन काॅंग्रेसने धडा घ्यावा-जयदीप कवाडे -आम आदमी पार्टी पंजाबवासीयांनी दिला मोठा पर्याय -उत्तरप्रदेशातील बहुजनांना मायावतीचा थोटांगपणा समाजला

5 राज्यातील पराभवाच्या नामुष्कीतुन काॅंग्रेसने धडा घ्यावा-जयदीप कवाडे
-आम आदमी पार्टी पंजाबवासीयांनी दिला मोठा पर्याय
-उत्तरप्रदेशातील बहुजनांना मायावतीचा थोटांगपणा समाजला

पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पंजाबला वगळता भाजप सत्ता स्थापन करणार आहे. तर पंजाबच्या जनतेने आम आदमी पक्षाला कौल देत नवीन पर्याय दिला. पाचही राज्यातील निवडणूकीत काॅंग्रेस पक्षाचा मोठा पराभवाचा सामना करावा लागला. काॅंग्रेसने आपल्या घटक पक्षांना दुजोरा देणे तसेच जांगाच्या वाटाघाटीत योग्य ताळमेळ न साधल्याने काॅंग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. आता तरी जनतेने दिलेल्या कौलातूने काॅंग्रेसने धडा घ्यावा, असा सल्ला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी काॅंग्रेसला दिला.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे बोलताना, जयदीप कवाडे म्हणाले की, उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीतील 403 जागांवरील निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. या निवडणुकीत भाजपने 264 जागांवर आघाडी मिळून राज्यात पुन्हा सत्ता स्थापनेचा मार्ग निश्चित केला आहे. तर सपाने सव्वाशे जागांवर मजल मारून भाजपच्या जागा कमी केल्या. तर बहुजनांचे कैवारी असल्याचे थोटांग करणाऱ्या मायावतींचा पक्षाचे फक्त दोन अंकी आमदारहीच शिल्लक राहिले नाही. दुसरीकडे देशातील दुसऱ्या क्रंमाकाचा काॅंग्रेसचे पण असेच काहीसे झाले. याला कारण काॅंग्रेस पक्षाचा अर्मूठपणामुळे मित्र पक्षासोबत त्यांचे मैत्रिपूर्ण व्यवहार हे जागे पूरतेच असते. याशिवाय आपण मोठा भावाची भूमिका समोर ठेवत काॅंग्रेस नेहमी अधिक जागांचा हट्टास त्यांचा असतो. मित्रपक्षाशी योग्य ताळमेळ नसाधल्यामुळे तसेच पक्षाअंतर्गत वादविवादामुळेच काॅंग्रेसला उत्तर प्रदेश, पंजाबसह इतर राज्यात पराभवाची नामुष्की स्वीकारावी लागली, असेही जयदीप कवाडे म्हणाले.
सध्या काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज आहे, यात कुठलीच शंका नाही. म्हणून काॅंग्रेसला पुन्हा सत्तेत यायचे असेल तर आपल्यात सुधारणा करावी. एक पाय मागे घेऊन मित्र पक्षांशी मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित करूनच त्यांना पुढे यश संपादन करता येणार. आताच्या निवडणूकीतून काॅंग्रेसने धडा घेतला तरच ते आगामी काळात सत्तेत येऊ षकतील असेही जयदीप कवाडे म्हणाले. गेल्या अनेक वर्षापासून बहुजन समाजाची दिक्षाभूल करण्याचे काम बहुजन समाज पक्षाने केले आहे. सोशल इंजिनिअयरींगचे नावाने भूलथापा देत देशातील बहुजनांच्या मतांचे ध्रुवीकरण करण्याचे काम मायावतीने केले. एक हाती सत्तेच्या थोटांगपणा करणाऱ्या मायावतीने अप्रत्यक्षपणे भाजपला मदत केली. त्यामुळेच उत्तर प्रदेषात सत्ता आज भाजपकडे गेली. तर पंजाब निवडणूकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या बहुमताचा कौल नव्या पर्यायाला जन्म देत आहे. आता तरी बहुजनांनी बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन विचारधारा स्वीकारावी आणि पंजाब प्रमाणे रिपब्लिकन पर्याय उभा करण्याचे आवाहनही जयदीप कवाडे यांनी केले.