भंडारा : दिव्यांग व्यक्तीच्या लसीकरणासाठी कॅम्प आयोजित

दिव्यांग व्यक्तीच्या लसीकरणासाठी कॅम्प आयोजित

भंडारा, दि.22:- दिव्यांग व्यक्तीचे कोविड 19 चे लसीकरण करण्यासाठी तालुका निहाय विशेष कॅम्प आयोजित करण्यात आले आहे. 23 जुलै 2021 रोजी लाखनी तालुक्यात केसलवाडा वाघ, मुरमाडी तुपकर, पिंपळगाव सडक, पोहरा व सालेभाटा. 26 जुलै 2021 रोजी लाखांदूर तालुक्यात दिघोरी, बारव्हा, कुडेगाव व सरांडी. 27 जुलै 2021 रोजी पवनी तालुक्यात कोंढा, ग्रामीण रुग्णालय अड्याळ, सावरला, आसगाव, भुयार. 28 जुलै 2021 रोजी साकोली तालुक्यात एकोडी, गोंडउमरी, खांबा, सानगडी, विर्शी येथे. 29 जुलै 2021 मोहाडी तालुक्यात रोजी आंधळगाव, बेटाळा, जांब, करडी, वरठी येथे तर 30 जुलै 2021 रोजी तुमसर तालुक्यात चुल्हाड, देव्हाडी, गोबरवाही, लेंडेझरी व नाकाडोंगरी येथे दिव्यांग व्यक्तींसाठी कोविड लसीकरणाच्या विशेष कॅम्पचे आयोजन केले आहे या कॅम्पचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.