आयबीपीएस सीईटी प्रशिक्षण चाळणी परिक्षेसाठी मदत क्रमांक

आयबीपीएस सीईटी प्रशिक्षण चाळणी परिक्षेसाठी मदत क्रमांक

गडचिरोली, दि.30: डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांचे मार्फत अनुसूचित जातीच्या उमेदवारांकरीता संस्थेमार्फत आयबीपीएस सीईटी प्रशिक्षण वर्ग विनामुल्य चालविले जात असतात. अनुसूचित जातीच्या उमेदवारांकरीता आयबीपीएस सीईटी प्रशिक्षण वर्गाकरीता निवड करण्यासाठी चाळणी परीक्षेचे आयोजन दिनांक 31 जुलै 2022 रोजी सकाळी 11.00 ते 12.00 या वेळेत गडचिरोली येथे पुढील ठिकाणी करण्यात आलेले आहे. परिक्षा केंद्राचे नाव जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी रोड, गडचिरोली व बैठक क्रमांक 01 ते 240 संपर्काकरीता मो.नं.9923287018, 8668398143, 8010588953 व शिवाजी महाविद्यालय, चामोर्शी रोड, गडचिरेाली बैठक क्रमांक 241 ते 888 संपर्काकरीता मो. नं.9423501710, 8668398143, 8010588953 याप्रमाणे उमेदवारांची बैठक व्यवस्था असून ज्या उमेदवारांनी वरील निवड चाळणी परीक्षेकरीता अर्ज सादर केलेले आहेत त्यांनी परीक्षेपुर्वी सदर केंद्रावर 1 तास अगोदर हजर राहावे असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली यांनी कळविले आहे.