806 सिकलसेल रुग्ण आणि 14 हजार 88 सिकलसेल वाहक

806 सिकलसेल रुग्ण आणि 14 हजार 88 सिकलसेल वाहक

जिल्हयात राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन अभियानाची सुरवात

भंडारा, दि. 4 : राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन अभियानाची सुरवात 1 जुलै 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते मध्य प्रदेशातील शहादोल येथून करण्यात आली. दुरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हा रुग्णालय भंडारा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलींद सोमकुंवर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.के.सोयाम तसेच अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन चव्हाण, अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अतुल टेभुर्णे उपस्थित होते.

 

जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सिकलसेल आजार हा अनुवांशिक असून प्रत्येकाने लग्नापूर्वी आपली रक्त तपासणी करावी व आपले सिकलसेल स्टेटस तपासून पहावे. त्यामुळे येणाऱ्या पिढीला या आजाराचा धोका होणार नाही याबाबत मार्गदर्शन केले. सिकलसेल रुग्णांना देण्यात येणाऱ्या शासकिय लाभाविषयी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी मार्गदर्शन केले.

 

जिल्हयात एकुण 806 सिकलसेल रुग्ण असुन 14 हजार 88 सिकलसेल वाहक आहेत कार्यक्रमादरम्यान लाल, पिवळे आणि पांढरे कार्ड प्रमुख पाहुण्यांचे हस्ते वितरीत करण्यात आले. दुरदृष्य प्रणालीद्वारे उद्वघाटनाचे वेळी जिल्हयातील उपजिल्हा/ग्रामिण रुग्णालय, 33 प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, 193 आरोग्य वर्धिनी उपकेंद्र स्तरावर लोकप्रतिनिधी व आरोग्य सेवेतील कर्मचारी बहुसंख्येने उपस्थितीत होते.

 

सदर कार्यक्रमात जिल्हा सिकलसेल समन्वयक रोहीणी पवार, सिकलसेल समुपदेशक चंदा शेंडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ राहुल मटाले, हेल्थ फॅसिलीटी मॅनेजर सचिन गहेरवार तसेच सिकलसेल वाहक रुग्ण, त्यांचे पारिवारीक सदस्य व जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.