गडचिरोली जिल्हयात सिकलसेल नियंत्रणासाठी “मुस्कान” अभियानाची सुरवात

गडचिरोली जिल्हयात सिकलसेल नियंत्रणासाठी “मुस्कान” अभियानाची सुरवात
कोरची तालुक्यात रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यासाठी
अनिमिया मुक्त कोरची अभियानाची सुरवात

गडचिरोली, दि.27:गडचिरोली जिल्हा जंगलव्याप्त व आदिवासी बहुल जिल्हा असून या जिल्हयात सिकलसेल आजारा रुग्णाचे प्रमाण जास्त आहे. शासनस्तरावरून राष्ट्रीय सिकलसेल निर्मुलन मिशन कार्यक्रम
सुरु करण्यात आलेला आहे. गडचिरोली जिल्हा आकांक्षित जिल्हा असून जिल्हाधिकारी संजय मीणा यांचे संकल्पनेतुन “मुस्कान” अभियान सुरु करण्यात आलेले आहे. या अभियानत जिल्हयातील सर्व १ ते १८ वर्ष वयोगटातील सर्व लाभार्थीची सिकलसेल तपासणी आरोग्य विभाग उपकेंद्र, प्रा.आ. केंद्र, उपजिल्हा / ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी यांचे मोफत करण्यात येणार आहे. तपासणी मध्ये निघालेल्या दुषीत सिकलसेल रुग्णांना कार्ड वाटप, योग्य औषधोपचार मोफत दिल्या जाणार आहे. सोबतच शासनाच्या विविध योजनेचा लाभ दुषीत रुग्णांना मोफत मिळवून देण्यात येईल. तसेच मुस्कान कार्यक्रमांतर्गत या बाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. “मुस्कान” अभियानांतर्गत जिल्हयातील सर्व नागरीकांनी सिकलसेल नियंत्रणाकरीता १ ते १८ वयोगटातील सर्व लाभार्थीनी सिकलसेल जपासणी करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले आहे. या संदर्भात अधिकची माहिती जवळच्या सर्व आरोग्य केंद्रात मिळेल. गडचिरोली जिल्हयात सर्व वयोगटातील महिलांमध्ये अनिमिया चे प्रमाणे जास्त आहे. अनिमिया चे प्रमाण कमी करण्याकरीता आयुषी सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संकल्पनातुन अनेमिया मुक्त कोरची अभियान कोरची तालुक्यात राबविण्यात येत आहे. सदर अभियानचे उद्देश अनेमियाचे प्रमाण कमी करणे व सर्व वयोगटातील महीलांचे आरोग्य जिवनमान वाढविणे, सर्व वयोमान महिलांच्या रक्तक्षयाची तपासणी करणे, सर्व वयोगटातील महिलांना गोळया वाटप करणे, रक्तक्षय कमी करण्यासाठी आहार व आरोग्य विषयक व समुपदेशन करणे हे आहे. सिकलसेल आजार नियंत्रण करीता “मुस्कान” व अनेमिया मुक्त कोरची अभियान या दोन्ही नाविन्य पुर्ण योजनेचे उदघाटन खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, व आयुषी सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या हस्ते २६ जानेवारी २०२४ रोजी ७५ वा प्रजासत्ताक दिनाचे औचित्त साधून करण्यात आहे. सदर कार्यक्रमामध्ये श्री. भुयार उपमुख्यकार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन जिल्हा परिषद गडचिरोली, डॉ. दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली, डॉ. प्रफुल हुलके, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, डॉ विनोद म्हशाखेत्री, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी, डॉ. रूपेश पेदाम, जिल्हा साथरोग अधिकारी, डॉ. अमित साळवे, तालुका आरोग्य अधिकारी, गडचिरोली, नागेश ताटलावार, मोबाईल मेडीकल पथक जिल्हा समन्वयक, रचना फुलझेले, जिल्हा सिकलसेल समन्वयक रा.आ.अ. व मोबाईल मेडीकल युनिट सर्च धानोरा व मोबाईल मेडीकल युनिट गडचिरोली उपस्थित होते. असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.