ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी वृद्धाश्रम चालविण्यास इच्छुक संस्थेने प्रस्ताव सादर करावे

ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी वृद्धाश्रम चालविण्यास इच्छुक संस्थेने प्रस्ताव सादर करावे

चंद्रपूर दि. 27 सप्टेंबर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी ‘अटल वयो अभ्युदय योजना’ अंतर्गत वृद्धाश्रम चालविण्यासाठी उत्सुक संस्थेकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे. एखादी संस्था उत्सुक असल्यास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,चंद्रपूर या कार्यालयास संपर्क साधावा व त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.