एकलारी येथे तालुकास्तरीय सुधारक सन्मान पुरस्कार वितरण सोहळा

एकलारी येथे तालुकास्तरीय सुधारक सन्मान पुरस्कार वितरण सोहळा

· महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडारा व किरण लोकसंचालित साधन केंद्राचे पुढाकार

· 24 पुरुषांना सुधारक सन्मान पुरस्कार

 

भंडारा, दि. 22 मे : महिला आर्थिक विकास महामंडळ भंडारा व किरण लोकसंचालित साधन केंद्र, वरठी अंतर्गत किरण गारमेंट अॅंड मॅन्युफॅक्चरिंग सेंटर एकलारी येथे आज गावातील 24 पुरुषांना तालुकास्तरीय सुधारक सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

नव तेजस्विनी उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत जेंडर न्यूट्रिशन या घटकामार्फत महिला सक्षमीकरणासाठी गाव पातळीवर पुढाकार घेत असलेल्या प्रति गाव एक प्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 196 जयंतीचे औचित्य साधून सुधारक सन्मान पुरस्कार वितरित करण्यात आले. आपल्या जिल्ह्यातील बालविवाह व अन्य अनिष्ट रूढी प्रथा यांना आळा घालणे व बचत गटातील महिलांनी तसेच त्यांच्या कुटुंबातील पुरुषांनी महिलांचा विकासासाठी गावात कार्य करावे, हेच या पुरस्काराचे उद्देश आहे.

 

कार्यक्रमाला मोहाडी येथील नायब तहसीलदार श्री. हुकरे, मंडळ अधिकारी श्री. ब्राह्मणकर, माविमचे जिल्हा समन्वय प्रदीप काठोळे व किरण लोकसंचालित साधन केंद्राच्या सचिव उपस्थित होते. कार्यक्रमा प्रसंगी मान्यवरांनी उपस्थित आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी किरण लोकसंचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक गौतम शहारे, किरण गारमेंट्स मॅन्युफॅक्चरींग अॅंड ट्रेनिंग सेंटर एकलारीच्या अध्यक्ष नुतन सार्वे यांच्यासह सहयोगिनी, लेखापाल, उपजीविका सल्लागार व पुरुष व महिला उपस्थित होते.