जिल्हास्तर हॉकी क्रीडा स्पर्धेचे आयोजन

जिल्हास्तर हॉकी क्रीडा स्पर्धेचे आयोजन

भंडारा दि. 3 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा यांचे वतीने दिनांक 5 ते 6 ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्हास्तर ज्युनिअर व सब ज्युनिअर नेहरु कप हॉकी क्रीडा स्पर्धचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, भंडारा येथे करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूसाठी जन्म तारखेनुसार वयोमर्यादा पुढीलप्रमाणे असुन त्यानुसार खेळाडूंचा सहभाग नोंदवावा. 15 वर्षे मुले सब ज्युनियर दिनांक 1 नोव्हेंबर 2007 रोजी किंवा त्यानंतरचा असावा, 17 वर्षे मुले ज्युनियर दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतरचा असावा, 17 वर्षे मुली ज्युनियर दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतरचा असावा.

तरी भंडारा जिल्हयातील सर्व शाळा/ महाविद्यालय/ यांनी सदर कार्यक्रमाची नोंद घेवून जास्तीत जास्त सहभाग दिनांक 4 ऑगस्ट 2022 पर्यंत नोंदवावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती आशा मेश्राम यांनी केले आहे. व अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा येथे संपर्क साधावा.