माजी सैनिकांनी हर घर तिरंगा कार्यक्रमात सहभागी व्हावे

माजी सैनिकांनी हर घर तिरंगा कार्यक्रमात सहभागी व्हावे

भंडारा दि. 3 : जिल्हयातील माजी सैनिक, विधवा व अवलंबितांना कळविण्यात येते की दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या कार्यक्रमा करिता जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवा व अवलंबितांनी उपक्रमात सहभागी व्हावे तसेच तिरंगा विकत घेण्यासाठी तलाठी कार्यालय, पोष्ट ऑफिस, ग्रामपंचायत, राशन दुकान, नगर पालिका, नगर परिषद येथे संपर्क करावा असे आवाहन महेश पाटील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, भंडारा यांनी केले आहे.