राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार

राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार

भंडारा दि. 3 : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागव्दारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता 10 वी व 12 वी च्या परिक्षेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधुन जिल्ह्यातुन /तालुक्यातुन शाळेतुन/कनिष्ठ महाविद्यालयातुन प्रथम येणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना “राजर्षी छत्रपती शाह महाराज गुणवत्ता पुरस्कार” सन 2003-04 या शैक्षणिक वर्षापासुन देण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

त्या अनुषंगाने भंडारा जिल्हयातील कार्यरत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी त्यांच्या शाळेतुन /महाविद्यालयातुन सन 2021-22 या सत्रातील फेब्रु/मार्च 2022 मध्ये 10 वी व 12 वी परिक्षेत प्रथम आलेल्या अनु.जाती/विजाभज/विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रस्ताव या कार्यालयास तात्काळ सादर करावे. उपरोक्त योजनांची अधिक माहिती करीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण भंडारा या कार्यालयास त्वरीत संपर्क साधावा. पात्र विद्यार्थ्यांना मिळणारी पुरस्काराची रक्कम जिल्ह्यातुन प्रथम- 25000/-, शाळेतुन प्रथम- 5000/-, तालुक्यातुन प्रथम – 10000/-, कनिष्ठ महाविद्यालयातुन प्रथम -5000/- अशी आहे. या पुरस्काराच्या अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी पत्ता -सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, भंडारा कार्यालयाचा पत्ता: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जि.प. चौक, भंडारा दुरध्वनी क्र.07184-295257 Email- acswobhandara@gmail.com वर संपर्क साधावा.