बालेवाडी येथील प्रशिक्षण शिबिरांसाठी इच्छुक खेळाडूंकडून अर्ज आमंत्रित

बालेवाडी येथील प्रशिक्षण शिबिरांसाठी इच्छुक खेळाडूंकडून अर्ज आमंत्रित

भंडारा, दि. 27 : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण करण्यासाठी 16 वर्षाखालील 30 मुलींसाठी 20 दिवसाचे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण शिबीरासाठी पी.सी.पांडीयण आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तामिलनाडू यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळणार आहे. खेळाडू शाळेत शिकत असलेला किंवा नसलेला असावा. तसेच शाळा व क्रीडा मंडळे यामध्ये सराव करणाऱ्या खेळाडू 1 जानेवारी 2023 रोजी 16 वर्षाखालील असावा खेळाडूंची उंची 175 से.मी. व त्यापुढे असणे आवश्यक आहे. सदर अटीची पुर्तता करणाऱ्या 5 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. खेळाडूला व्हॉलीबॉल खेळाचे ज्ञान कौशल्य असणे आवश्यक आहे. तरी संबंधित खेळाडूंनी आपली माहिती दिनांक 30 जून 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा येथे सादर करण्यात यावी. असे आवाहन श्रीमती आशा मेश्राम, जिल्हा क्रीडा अधिकारी, भंडारा यांनी केले आहे.