सामाजिक न्याय दिनी” तृतीयपंथीयांचा सत्कार

सामाजिक न्याय दिनी तृतीयपंथीयांचा सत्कार

भंडारादि. 27 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,  येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंती निमीत्त दि. 26 जून रोजी “सामाजिक न्याय दिन” साजरा करण्यात आला.  महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये दुर्लक्षीत म्हणून समजल्या जाणारा एक घटक म्हणजे तृतीयपंथी.  तृतीयपंथीयांची भंडारा जिल्ह्यात अत्यल्प संख्या आहे.  त्यांना समाजात मानाचे स्थान देवून त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेवून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. अशा दुर्लक्षीत घटकाला श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, सहा.आयुक्त यांनी त्यांच्या संकल्पनेतून सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून भंडारा येथे स्थायी असलेल्या नायकरीना व खुशबुबाई या तृतीयपंथीयांचा साडी-चोळी व आहेर देवून सत्कार केला. श्रीमती सुकेशिनी तेलगोटे सहाय्यक आयुक्त, यांनी आम्हाला साडी-चोळी व आहेर देवून आमचा सत्कार केला असा सत्कार भंडारा जिल्ह्यात आजपर्यंत प्रथमच करण्यात आला असून आम्हाला समाजात मानाचे स्थान मिळवून दिले व आमचे मनोधैर्य वाढविले आहे असे मनोगत नायकरीना व खुशबुबाई या तृतीयपंथीयांनी व्यक्त केले.