वर्षात मिळणार तीन स्थानिक सुट्या

वर्षात मिळणार तीन स्थानिक सुट्या

 

भंडारा, दि.02: 2023 या वर्षाकरिता भंडारा जिल्ह्याला स्थानिक सुट्या जाहीर करण्यात आला आहेत. त्यानुसार सहा मार्च 2023 होळीनिमित्त, 15 सप्टेंबर 2023 पोळ्याच्या दुसरा दिवस असल्याने व 13 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळी अतिरिक्त अशा तीन दिवसाच्या स्थानिक सुट्या जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जाहीर केल्या आहेत. तसेच त्याबाबतीचे लेखी आदेश निर्गमित केले आहेत. हा आदेश भंडारा जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि अधिकोष म्हणजे बँकांना लागू होणार नाही.