डी.एल.एड प्रथम वर्ष प्रवेश ऑनलाईन आवेदन करावे

डी.एल.एड प्रथम वर्ष प्रवेश ऑनलाईन आवेदन करावे

भंडारा, दि. 27 : सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक पदविका (D.EI.ED) प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2022-23 मधील शासकीय कोट्यातील व व्यवस्थापन कोट्यातील जागा ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येतील. प्रवेश प्रक्रिया खालीलप्रमाणे राबविण्यात येईल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश होईल. यासाठी विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in संकेत स्थळावरून ऑनलाईन अर्ज करू शकतात याबाबत सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

1. प्रवेशाची शैक्षणिक पात्रता- इयत्ता 12 वी उत्तीर्ण (खुला संवर्ग 49.5% व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग

44.5% गुणांसह)

2. प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी- दि. 23/06/2022 ते 07/07/2022

3. पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करणे व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पत्र प्राप्त करणे- दि. 23/06/2022 ते 08/07/2022

4. प्रवेश अर्ज शुल्क (ऑनलाईन भरणे)- खुला संवर्ग रूपये 200/-, खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग रूपये 100/-

अर्ज ऑनलाईन (APPROVE) केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेशप्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याचे स्वत: निवड करून लगेचच प्रवेशपत्र स्वता:च्या ईमेल/लॉगीनमधून प्रिंट घ्यावयाची आहे व त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावयाचा आहे,असे प्राचार्य राधा अतकरी यांनी कळविले आहे.