विनाअपघात सेवा करणाऱ्या चालकांचा गौरव

विनाअपघात सेवा करणाऱ्या चालकांचा गौरव

 

भंडारा दि. 27: राज्य परिवहन बसेसचे अपघात टाळण्याच्या चालकांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळावे या दृष्टीकोणातून राज्य परिवहन मंहामंडळाच्या भंडारा विभागामार्फत 25 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत विनाअपघात सेवा करणाऱ्या चालकांचा सपत्नीक 26 जानेवारी रोजी चालक प्रशिक्षण केंद्र येथे गौरव करण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यंत्र अभियंता (चालक) महेंद्रकुमार नेवारे हे होते. यावेळी श्री. नेवारे म्हणाले की, विनाअपघात सुरक्षित सेवा प्रदान करून प्रवाशांचा राज्य परिवहन महामंडळावरील सुरक्षित प्रवासाबद्दलचा विश्वास वृध्दीगत करून चालकांनी विशेष प्रयत्न केलेला आहे. चालकांच्या व वाहनातील दोषामुळे अपघात होणार नाही या करिता सर्व राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी एकत्रीत प्रयत्न करणे गरजेचे आहे.

 

कार्यक्रमाला विभागीय वाहतुक अधिकारी (ता) ना.गोल्हर, विभागीय सांख्यिकी अधिकारी रा.म.तलमले, विभागीय लेखा अधिकारी सु.बा.वाघधरे, सुरक्षा व दक्षता अधिकारी मो.ट.कानफाडे, विभागीय अभियंता सु.कि.बायस, कामगार अधिकारी प.गौ.शंभरकर तसेच आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

भंडारा, साकोली, तुमसर, तिरोडा व गोंदिया आगारा मधील चालकांचा यावेळी गौरव करण्यात आला. यामध्ये भंडारा आगारामधील चालक सावजी नागमोते, वसंत लांजेवार, सैय्यद रियाज अली सै. वहीर अली, विरसिंग मडावी, किशोर जगताप साकोली आगारामधील चालक अब्दुल अजीज अ. हकीम शेख, हेमराज वाघाये, मो. शाकीर मो. साबीर शेख तुमसर आगारामधील चालक वसंत निखाळे, आनंदकुमार डहाके तिरोडा आगारामधील चालक आसीम खान रहेमान खान पठाण तर गोंदिया आगारामधील चालक मोतीलाल शर्मा, धनलाल जोशी, नामदेव कुथे, छगन नेवारी, शेख इब्राहीम शेख अमीर या सर्वांना रूपये 25 हजार धनादेश, सन्मानपत्र, 25 वर्ष विना अपघात सेवेचा बिल्ला, स्मृती चिन्ह व गौरवपात्र चालकांच्या पत्नीस साडी व खण देवून सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कामगार अधिकारी प.गौ. शंभरकर यांनी तर आभार प्रदर्शन विभागीय लेखा अधिकारी सुरेद्रजी वाघधरे यांनी केले.