सर्पदंश उपचार व्यवस्थापन प्रशिक्षणाबाबत कार्यशाळा संपन्न

सर्पदंश उपचार व्यवस्थापन प्रशिक्षणाबाबत कार्यशाळा संपन्न

· स्नेकबाईट हिलींग ॲन्ड एज्युकेशन सोसायटीच्या तज्ञांनी केले मार्गदर्शन

भंडारा, दि. 16 : पावसाळयात होणाऱ्या सर्पदंशाच्या पार्श्वभुमीवर जनजागृतीच्या उददेशाने आरोग्य विभागातर्फे सर्पदंश, उपचार व व्यवस्थापन विषयी कार्यशाळेचे आयोजन काल नियोजन भवन येथे करण्यात आले. देशात, राज्यात तसेच जिल्हयात सर्पदंशाने होणाऱ्या मृत्युच्या घटनांची नोंद घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, भंडारा व स्नेकबाईट हिलींग ॲन्ड एज्युकेशन सोसायटी मुंबई यांचे समन्वयाने काल नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे प्रमुख उपस्थितीत तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिक्षक, वैद्यकिय अधिकारी, जिल्हा रुग्णालयातील भिषक, बालरोगतज्ञ, वैद्यकिय अधिकारी, सामुदाय आरोग्य अधिकारी, परिचारीक, यांचे सर्पदंश, उपचार व व्यवस्थापनविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेला डॉ.मिलींद सोमकुंवर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.भंडारा, डॉ.दिपचंद सोयाम, जिल्हा शल्य चिकित्सक, सा.रु.भंडारा, डॉ.प्रियंका कदम, संस्थापक, स्नेकबाईट हिलींग ॲन्ड एज्युकेशन सोसायटी मुंबई, डॉ.फ्रेस्टन मार्क सिरुर, सहाय्यक प्राध्यापक, इमरजन्सी मेडिसीन विभाग, कस्तुरबा मेडिकल कॉलेज, मनिपाल ॲकॅडेमी कर्नाटका, कु.कृतीका सालाईने, कु.उषा वाहाले, इमरजन्सी मेडिकल टेक्निशियन, कर्नाटका हे उपस्थितीत होते.सदर कार्यशाळेतील प्रथम सत्रात डॉ. डॉ.फ्रेस्टन यांनी Cling Management of Snakbites & Post Hospitallization Wound Managenment या विषयांवर विस्तृत मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात कस्तुरबा मेडिकल कॉलेज, मनिपाल येथील इमरजन्सी मेडिसीन टिमद्वारे इमरजन्सी मेडिकल स्पेशालीस्ट तसेच इमरजन्सी मेडिसीन टेक्निशियन यांनी मानवाच्या पुतळयावर इन्टयुबेश बाबत प्रात्याक्षीक करुन दाखवीले.

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्हयातील सर्पदंशाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्येशाने कार्यशाळा पावसाळापूर्व घेणे गरजेचे असुन दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन सर्पदंश, उपचार व व्यवस्थापन या विषयी कार्यक्षेत्रात सर्पदंश झालेल्या रुग्णांचे सर्पदंश व व्यवस्थापन करतांना महत्वपूर्ण ठरतील असे विचार व्यक्त केले. या कार्यशाळेचे प्रास्तावीक व आभार डॉ.श्रीकांत आंबेकर यांनी मानले.