सिंदेवाही : बाल विकास प्रकल्प कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी

सिंदेवाही : बाल विकास प्रकल्प कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी

बातमी संकलन – सुनिल गेडाम, लाडबोरी

सिंदेवाही: लाडबोरी येथे कोविड १९ च्या महामारी मध्ये प्रशासशाने अंगणवाडी मार्फत लहान मुलांना पोषण आहार वाटप करण्यात आले होते मात्र पोषण आहार उच्च दर्जेदार नसल्याने या संदर्भात तक्रार सामाजिक कार्यकर्ते , ग्रामपंचायत सदस्य व गावातील पालक वर्ग यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी, सिंदेवाही यांचेकडे लेखी तक्रार दाखल केली होती.
पण साधारण ३ ते ४ महिन्याचा कालावधी होवुन सुद्धा या तक्रारी ची दखल घेतल्या गेली नाही.
लहान मुलांच्या निकृष्ट पोषण आहार बाबत जी समय सूचकता बाल विकास प्रकल्प अधिकारी नी दाखवली व संबधित अंगणवाडी ला भेट देऊन आपले कर्तव्य पार पाडले त्यांचे स्वागत आहे.
पण दाखल झालेल्या तक्रारी वर अजूनही काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही असा आरोप तक्रार दारांनी केला आहे.