मतदानाच्या दिवशी सुटी जाहीर

मतदानाच्या दिवशी सुटी जाहीर

             भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार लोकसभा मतदान 19 एप्रिल 2024 रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे  मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या ठिकाणी योग्य ती सवलत देण्यात येते.

          मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले की संस्था ,खासगी आस्थापना इत्यादी भरपगारी सुटी किंवा सवलत देत नाही, त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागते .हे लक्षात घेता,

            तसेच 22 मार्च, 2024 या परिपत्रकानुसार लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल, रोजी  सुटी जाहीर करण्यात आली आहे .याबाबतचे लेखी निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी निर्गमित केले आहेत .तसेच कार्यालय प्रमुख ,अधिकारी ,कर्मचारी व्यावसायिक संस्था ,व्यापारी केंद्र, औद्योगिक कारखाने इत्यादीमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्याचे देखील त्यांनी सूचित केले आहे.