स्थानिक गुन्हे शाखा, येथील अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाची भरीव कामगीरी
अल्पवयीन बालकांच्या अपहरणासंबंधाने तातडीने गुन्हे दाखल करण्याचे शासनाच्या विधी विभागाचे आदेश आहेत. तसेच अल्पवयीन बालकांच्या अपहरणासंबंधाने शासनाने निश्चीत धोरण तयार करुन अपहृत बालकांचा शोध घेण्याच्या सुचना शासनस्तरावरुन निर्गमीत केल्या आहेत व त्याच अनुषंगाने अल्पवयीन बालकांची तस्करी रोखण्याकरीता प्रत्येक जिल्हयात अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष स्थापित करण्यात आले आहेत. भंडारा जिल्हयातही अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष स्थापन करण्यात आले असुन त्याचे प्रभारी अधिकारी म्हणुन पोलीस निरीक्षक श्री. नितीन चिंचोळकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पोलीस स्टेशन पवनी अप.क्र. ११७/२०१६ कलम ३६३, ३७० भा.दं. वि. गुन्हयातील अपहृत पिडीता वय १७ वर्ष हिला दिनांक ०९/१०/२०१६ रोजी अज्ञात आरोपीने फुस लावुन पळवुन नेले होते त्यावरुन पो.स्टे. पवनी येथे गुन्हा नोंद
करुन त्याचा तपास अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता. सदर
गुन्हयातील अपहृत पिडीत मुलीचा अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षातील अधिकारी, अंमलदार
यांनी अत्यंत बारकाईने व कशोशीने प्रयत्न करुन तब्बल ०७ वर्षानंतर अपहृत मुलीचा गुजरात
राज्यातुन शोध घेण्यात पोलीसांना यश आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा अंतर्गत कार्यान्वीत असलेल्या अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी मागील ७ वर्षापासुन बेपत्ता असलेल्या अपहृत पिडीतेचा गुजरात या राज्यातुन शोध घेवुन उल्लेखनीय कामगीरी केली आहे, याकरीता सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा अतंर्गत कार्यरत असलेल्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने पोलीस निरीक्षक श्री. नितीन चिंचोळकर यांचे मार्गदर्शनात सन २०२३ मधे एकुण ०६ गुन्हयातील अल्पवयीन पिडीतांचा शोध घेवुन भरीव कामगीरी केलेली आहे. त्यात पोलीस स्टेशन भंडारा अप.क. ३५३/२०२१ कलम ३६३, ३७० भा.दं. वि. गुन्हयातील अपहृत मुलीचा तब्बल ०२ वर्षानंतर राजस्थान राज्यातुन तसेच पोलीस स्टेशन पवनी अप.क. ११७/२०१६ कलम ३६३, ३७० भा.दं. वि. गुन्हयातील अपहृत मुलीचा तब्बल ०७ वर्षानंतर गुजरात राज्यातुन शोध घेण्यात यश आलेले आहे.