सिंदेवाही नगर पंचायत चे प्रभाग निहाय क्षेत्राची निर्मिती व आरक्षणाची माहिती प्रसिद्ध करावी – मिथुन मेश्राम

सिंदेवाही नगर पंचायत चे प्रभाग निहाय क्षेत्राची निर्मिती व आरक्षणाची माहिती प्रसिद्ध करावी – मिथुन मेश्राम

सिंदेवाही नगरपंचायत ची नगराध्यक्ष पदाकरिता निवडणूक सन २०१६ मध्ये झाली होती. नगरपंचायत ची निवडणूक होवुन आता पाच वर्ष पूर्ण होत आहेत. त्या मुळे परत यावर्षी नगरपंचायत निवडणूका लागणार आहेत. त्याकरिता लवकरात लवकर प्रभाग रचना करून आरक्षणाची माहिती जनहितासाठी प्रसिद्ध करण्यात यावी याकरिता आज दिनांक १८/०६/२०२१ रोजी मिथुन मेश्राम यांनी मा. राज्य निवडणूक आयोग प्रशासकीय कार्यालय व जिल्हा अधिकारी तथा निवडणूक अधिकारी चंद्रपूर आणि सिंदेवाही तालुक्याचे तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी यांना पत्र पाठविले आहेत.
प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रभाग निहाय क्षेत्राची रचना व मतदार यादी यामुळे नगरपंचायत क्षेत्रातील सर्व मतदारांना आपले नाव व घर नक्की कोणत्या प्रभागात आहेत किंवा पाहिजेत यासाठी मदत होणार आहे.