chandrapur I सर्व कार्यकर्त्‍यांनी समाजाची सेवा करत सेवा सप्‍ताह साजरा करावा – आ. सुधीर मुनगंटीवार

सर्व कार्यकर्त्‍यांनी समाजाची सेवा करत सेवा सप्‍ताह साजरा करावा – आ. सुधीर मुनगंटीवार

मोदी सरकारच्‍या सप्‍तवर्षपुर्तीनिमीत्‍त ऑक्‍सीजन कॉन्‍सन्‍ट्रेटर लोकार्पण

आज जेव्‍हा जनता संकटात आहे तेव्‍हा आमच्‍यासाठी खुर्ची नाहीतर जनता, राजकारण नाहीतर समाजकारण व सत्‍ता नाहीतर सेवा महत्‍वाची आहे. मागील सात वर्षात मोदी सरकारने देशहिताची अनेक कामे केली, परंतु ही लढाई अजून संपलेली नाही. मोदीजींच्‍या विचारावर संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते सेवाभावी वृत्‍तीने कोरोनाच्‍या संकटातही कार्य करीत आहे. याप्रसंगी सर्व कार्यकर्त्‍यांनी समाजाची सेवा करत सेवा सप्‍ताह साजरा करावा, असे आवाहन विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे भारतीय जनता पार्टीच्‍या वतीने मोदी सरकारच्‍या सप्‍तवर्षपुर्तीनिमीत्‍त आयोजित ऑक्‍सीजन कॉन्‍सन्‍ट्रेटर च्‍या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.

 

याप्रसंगी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते २५ ऑक्‍सीजन कॉन्‍सन्‍ट्रेटरचे लोकार्पण करण्‍यात येवून चंद्रपूर महानगर, ब्रम्‍हपूरी, नवेगांव मोरे, ताडाळी, कोरपना, विरूर व मुल येथील मुख्‍य पदाधिका-यांना सुपुर्द करण्‍यात आले. यावेळी भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष (ग्रामीण) देवराव भोंगळे, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष (महानगर) डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, माजी आमदार अॅड. संजय धोटे, महानगर महामंत्री राजेंद्र गांधी, सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रविंद्र गुरनुले, कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, कामगार मोर्चा प्रदेश सचिव अजय दुबे, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष (शहर) विशाल निंबाळकर, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष (ग्रामीण) आशिष देवतळे, मनपा सदस्‍य संजय कंचर्लावार, देवानंद वाढई, छबू वैरागडे, मुल नगर परिषदेचे उपाध्‍यक्ष नंदू रणदिवे, जिल्‍हा महिला आघाडी अध्‍यक्षा (ग्रामीण) अलका आत्राम, विवेक बोढे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

 

यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झालीत. भारतमातेच्‍या सेवेसाठी, भयमुक्‍त, विषमतामुक्‍त, आतंकवादमुक्‍त, दहशतवादमुक्‍त, नक्षलवादमुक्‍त माझी भारतमाता व्‍हावी यादृष्‍टीने जनतेने मोदीजींवर विश्‍वास ठेवला. या सात वर्षात मोदी सरकारने घेतलेले निर्णय तुम्‍हाला, आम्‍हाला व भारतमातेला आनंद देणारे ठरले. मोदीजींनी देशहितासाठी भारतमातेच्‍या चरणी ३७० कलम रद्द करून काश्‍मीर पासून कन्‍याकुमारी पर्यंत भारत एक आहे ही भावना जनतेच्‍या मनात निर्माण केली. प्रधानमंत्री पदाचा कोणताही अहंकार न ठेवता मी प्रधान सेवक आहे ही भावना ठेवून देशसेवेत स्‍वतःला अर्पण करणारे मोदीजी हे पहिले प्रधानमंत्री आहेत. संविधान माझ्यासाठी धर्मग्रंथ आहे. मी काय केलं याचा पाढा सप्‍तवर्षीपुर्तीनिमीत्‍त वाचु नका तर कोरोनाच्‍या संकटात जनतेच्‍या सेवेत स्‍वतःला झोकून द्या, असे मोदींनी केलेल्‍या आवाहनला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टी कोरोनाच्‍या संकटात जनतेच्‍या पाठिशी आहे असे ते म्‍हणाले.

 

कोविड १९ च्‍या संकटात जी मुले कोरोनामुळे अनाथ झाली त्‍यांच्‍यासाठी पी.एम. केअर फंडातून संपूर्ण शिक्षणासाठी व वयाच्‍या २३ व्‍या वर्षी १० लक्ष रू. देण्‍याची घोषणा मोदीजींनी केली आहे. त्‍यामुळे जिल्‍हयातील अशा कुटूंबामागे भाजपा कार्यकर्त्‍यांनी उभे राहून त्‍यांना सहकार्य करावे, असे आवाहन त्‍यांनी केले. यावेळी भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी जिल्‍हयात सुरू असलेल्‍या विविध सेवा प्रकल्‍पांची माहिती करून दिली. कार्यक्रमाला चंद्रपूर महानगरातील मंडळ अध्‍यक्ष रवि लोनकर, सचिन कोतपल्‍लीवार, संदीप आगलावे, ताडाळी येथील सरपंच संगिता पारखी, सदस्‍य संजोग अडबाले, अमित पारखी, ब्रम्‍हपूरी तालुकाध्‍यक्ष शामलाल दोनाडकर, अनिल तिजारे, नवेगाव मोरे येथील विनोद देशमुख, अजय मस्‍के, मुल येथील प्रशांत समर्थ, राकेश ठाकरे, किशोर कापगते, धनराज कोवे, धम्‍मप्रकाश भस्‍मे, चंदन पाल यांची उपस्थिती होती.