नाल्यातील बांधकाम साहित्य काढून मनपाने वाहते केले सांडपाणी

नाल्यातील बांधकाम साहित्य काढून मनपाने वाहते केले सांडपाणी

मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166

चंद्रपूर, ता १० : मूल मार्गावर डाॅ. सरदेशपांडे यांच्या दवाखान्यासमोर मोठ्या नाल्यामध्ये पडलेले बांधकाम साहित्य मनपा कर्मचाऱ्यांनी जेसीबी मशीन लावून बाजूला केले. महापालिका प्रशासन नेहमीच शहरातील सुरु असलेली विविध कामे व त्यांच्या योग्य कार्यपद्धतीबद्दल दक्ष असते. एखाद्या ठिकाणी सुरु असलेल्या विकासकामांमुळे नागरिकांना त्रास होत असेल किंवा अन्य काही व्यवधान उत्पन्न होत असेल तर पालिका प्रशासन नेहमीच त्वरित कार्यवाही करते.
 
चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत मूल मार्गावर डाॅ. सरदेशपांडे यांच्या दवाखान्यासमोर मोठ्या नाल्यावर पुलाचे वाढीव बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू आहे. दरम्यान नाल्यामध्ये बांधकाम साहित्य टाकण्यात आल्याने सांडपाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यातच सोमवारी सकाळपासून पाऊस सुरू असल्याने जवळपासच्या परिसरातील सांडपाणी वाहून जाण्यास व पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण झाली.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मार्फतीने जेसीबी मशीन लावून बांधकाम साहित्य बाहेर काढून पाणी वाहते करण्यात आले.