chandrapur I सिंदेवाही पोलिसांचे अवैध दारू विक्रेत्यांनी विरुद्ध धाडसत्र सुरूच

सिंदेवाही पोलिसांचे अवैध दारू विक्रेत्यांनी विरुद्ध धाडसत्र सुरूच

दिनांक 31/05/2021 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सिंदेवाही येथील ठाणेदार योगेश घारे, पीएसआय नेरकर, व पोलीस पथक यांना
मुखबिरद्वारे प्रोव्हीबीशन बाबत खबर मिळाल्याने पोलीस पथक सह रवाना होवून मौजा वासेरा ते जामशाळा ता.सिंदेवाही रोडवर नाकाबंदी करीत असतांना एक चारचाकी FIAT कंपनिची कार वाहन क्र . MH-43/4296 सिल्व्हर कलर ची संशयित आढळल्याने आम्ही पो .स्टाँप व पंचासमक्ष सदर वाहनांची झडती घेतली असता , नमूद कार मद्ये,
1) टायगर ब्रँड कंपनीची देशी दारु 16 नग खाकी खोक्यात एकूण किंमत :-1,60,000

2) FIAT LINIA EMOTION कंपनिची चारचाकी सिल्वर रंगाची कार क्र .MH-43 – X4296 किंमत :- 5,00,000 रू.व आरोपी नामे हीतेश किशन कोण्कूलवार वय 22 वर्ष रा. राजोली ता .मूल जि .चंद्रपूर व सोबत इतर दोन आरोपी सह मिळून आले.
नमूद आरोपिला सदर देशी दारू कुठून व कुणाकडून आणली याबाबत विचारणा केली असता सदर देशी दारु सुशांत बण्डिकवार रा.वासेरा ता .सिंदेवाही यांचे कडून जुन्या गोढावून मधून मुदयेमाल आणल्याचे सांगितले. तात्काळ आरोपींना ताब्यात घेवून सांगितले प्रमाणे सदर घटनास्थळ ची पंचासमक्ष पो स्टाँपनी झडती घेतली असता घरझडतीत,
रॉकेट संत्रा कंपनीची देशी दारु 10 नग खाकी खोक्यात एकूण किंमत :- 1,07,000 /- रू चा माल. असा एकूण 27 पेट्या देशी दारू चा माल.
सदर कारवाईत एकूण 7,67,000/- रू चा माल पंचा समक्ष जप्त करून एकूण चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले. व पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पीएसआय नेरकर हे करीत आहेत.