जिल्हा पणन कार्यालयाकडून धडक कारवाई

जिल्हा पणन कार्यालयाकडून धडक कारवाई

       भंडारा दि.24: आधारभूत किंमत धान खरेदी योजना रब्बी हंगाम २०२२-२३ मध्ये शासन निर्णयानुसार धान खरेदी अंतर्गत दि.१०/०७/२०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. रब्बी हंगामातील धानाचे डी. ओ. निर्गमित करण्याचे काम जिल्हा पणन कार्यालयाकडून सुरू आहे.

         परंतु, जिल्ह्यातील काही संस्थांकडे धानसाठा उपलब्ध नसल्याबाबत तक्रारी कार्यालयास प्राप्त नाल्यावरून आकांक्षा बहुउद्देशिय सर्व साधारण सह. संस्था मर्या. भंडारा केंद्र डोंगरला ता. तुमसर जि. भंडारा या संस्थेकडून डी. नो. पोटी धान उपलब्ध होत नसल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. सदर तक्रारीस अनुसरून प्रधान कार्यालयाकडून नियुक्त सुली पथक यांच्या मदतीने आणि मा. जिल्हाधिकारी साहेब व मा. पोलिस अधीक्षक यांच्या सहकार्याने स्थेकडील धानसाठा ताब्यात घेण्याचा निर्णय झाला.

     व जिल्हा पणन अधिकारी कार्यालय, भंडाराकडून धडक कारवाईची मोहिम राबवून पोलिस बंदोबस्तात संस्थेच्या गोदामामधील धानसाठा उचल करण्याचे कामकाज सुरू करण्यात आले. नसाठा उचल करताना गावचे सरपंच, पोलिस पाटील, स्थानिक नागरिक तसेच पोलिस स्टेशन तुमसरचे हवालदार यांच्या दतीने आणि साक्षीने पंचनामा करून धडक कारवाई करून धानसाठा ताब्यात घेण्याचे कामकाज सुरू आहे.

        तसचे संस्थाचालकाकडून अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याने धानाची उचल करण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास येताच जिल्हा पणन कार्यालयाच्या धडक कारवाईने पोलिस संरक्षणात धानसाठा जप्त करून ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे.धान उपलब्ध करून न देणाऱ्या जिल्ह्यातील इतर संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे यापुढे शासनाचा धान साठा उपलब्ध न झाल्यास संस्थांवर कडक कारवाईचे संकेत जिल्हा पणन अधिकारी  एस.एस. पाटील यांनी कळविले आहे.