chandrapur I पुरोगामी पत्रकार संघातर्फे भगवंतराव पोपटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली

पुरोगामी पत्रकार संघातर्फे भगवंतराव पोपटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली

सिंदेवाही: सिंदेवाही तालुक्यातील पुरोगामी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष भगवंत पोपटे यांचे काल कोवीड १९ या आजाराने निधन झाले. त्याच पश्चात पुरोगामी पत्रकार संघातर्फे शोक सभेचं आयोजन करण्यात आले होते. या शोक सभेला उपस्थित सिंदेवाही पोलिस स्टेशन चे पी एस आय गोपिचंद नेरकर साहेब, रणधीर मदारे सर उपस्थित होते. नेरकर साहेबांनी आपल्या शोक संदेश मधून पोपटे साहेबांच्या पत्रकारिता ची प्रशंसा करीत एक ज्येष्ठ व निर्भिड पत्रकार आपणास सोडून गेले याचं मला दुःख आहे. पोपटे यांच पोलिस स्टेशन मधील सर्व कर्मचारी वर्गाशी आपुलकीचं नातं होत. रणधीर मदारे सरांनी शोक संवेदना व्यक्त करत पोपटे साहेब निर्भिड पत्रकार होते.काल पर्यंत पोपटे साहेबांनी नेहमी प्रेमभावने व्यवहार केलेत ते नेहमी आठवणीत राहतील बोललेत.
सिंदेवाही पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक योगेश घारे साहेबांनी फोनद्वारे संघटनेच्या कार्यकर्त्यांशी बोलुन दुःख व्यक्त केलेत. पोपटे साहेब आपना सर्वांमधुन निघुन गेलेत या बद्दल खूप वाईट वाटतो,ते पोलिस शांतता समितीचे ते सदस्य होते व पोलिस वर्गाला नेहमी सहकार्य करीत असायचे. पोपटेजी अनेकदा मला भेटायचे आपले काही अनुभव शेअर करायचे मी सुद्धा त्यांच्याशी आपले काही अनुभव शेअर करायचो. आम्ही नेहमी हस्तांदोलन करायचो आज ते आपल्यात नाहीत त्याचं खूप दुःख आहे. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अश्या शब्दात त्यांनी शोकसंदेश दिला. त्याचप्रमाणे या शोकसभेचे आयोजन पुरोगामी पत्रकार संघ,सिंदेवाही यांनी केले.या शोकसभेत जितेंद्र नागदेवते, आक्रोश खोब्रागडे, दुधे साहेब , सुनिल गेडाम, मिथुन मेश्राम , अमन भाई , अमोल निनावे हे उपस्थित होते.सर्वांनी पुष्प अर्पण करून व शब्दात सगळ्यांनी पोपटे साहेबाना श्रद्धांजली वाहिली. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश शेंडे व आभार प्रदर्शन कुणाल उंदिरवाडे यांनी केले.