माती / तांदुळ अर्पण करून राष्ट्रव्यापी अभियानात सहभागी व्हा – आयुक्त विपीन पालीवाल अमृत कलश रथाचे उदघाटन

माती / तांदुळ अर्पण करून राष्ट्रव्यापी अभियानात सहभागी व्हा – आयुक्त विपीन पालीवाल
अमृत कलश रथाचे उदघाटन

चंद्रपूर १५ सप्टेंबर – मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश अभियान अंतर्गत घरोघरी जाऊन माती / तांदुळ संकलित करणाऱ्या अमृत कलश रथांचे उदघाटन १५ सप्टेंबर रोजी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन करण्यात आले. आपल्या घरातील थोडी माती किंवा माती उपलब्ध नसेल तर थोडेसे तांदुळ या अमृत कलशात अर्पण करून या राष्ट्रव्यापी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
संपुर्ण देशभरात शहीद वीरांना मानवंदना देण्यासाठी मेरी माटी मेरा देश अभियानाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. या अभियानात चंद्रपूर शहरातील नागरीकांचा सहभाग असावा यादृष्टीने चंद्रपूर महानगरपालीकेतर्फे अमृत कलश रथ तयार करण्यात आले असुन त्याद्वारे शहरातील प्रत्येक घरातुन माती अथवा तांदुळ संकलित केले जाणार आहे.
झोननिहाय ३ अमृत रथ तयार करण्यात आले असुन सहायक आयुक्त यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात हे रथ शहरात फिरणार आहेत. घराघरातुन छोट्या कलशांद्वारे संकलित माती व तांदूळ एकत्र आणून मोठ्या कलशात ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर जिल्हास्तरावरुन मुंबई व नंतर दिल्ली येथे पाठवुन हुतात्मा स्मारकाजवळ ‘अमृत वाटिके’ मध्ये विसर्जित केली जाणार आहे. ही मोहीम ३० सप्टेंबरपर्यंत चालणार उदघाटन प्रसंगी पंचप्रण शपथ घेण्यात आली तसेच देशासाठी लढा देणाऱ्या शहीदांना मानवंदना देण्यात आली.
याप्रसंगी उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त अशोक गराटे,माजी महापौर अंजली घोटेकर, माजी झोन सभापती देवानंद वाढई, सहायक आयुक्त सचिन माकोडे, नरेंद्र बोभाटे, राहुल पंचबुद्धे, डॉ.वनिता गर्गेलवार,डॉ.अमोल शेळके,उपअभियंता रवींद्र हजारे,रवींद्र कळंबे,नागेश नित,संतोष गर्गेलवार उपस्थीत होते.