chandrapur I ढिवर भोई समाजा तर्फे सायंकाळी ४ ते ६ मासोळी विकण्याची परवानगी देण्याची मांगणी.

ढिवर भोई समाजा तर्फे सायंकाळी ४ ते ६ मासोळी विकण्याची परवानगी देण्याची मांगणी.

सिंदेवाही: नुकत्याच आलेल्या कोरोना च्या महामारी मुळे भारत भर लॉकडाउन चे सत्र चालू आहे. महाराष्ट्रात ही प्रत्येक १५ दिवसाला लॉकडाउन वाढतच आहे. १ जुन ते १५ जून पुन्हा लॉकडाउन होण्याच निश्चित होत आहे. सध्या चालू असलेल्या लॉकडाउन मध्ये जीवनावश्यक किराणा व भाजीपाला विक्रीस सकाळी ७ ते ११ परवानगी देण्यात आलेली आहे . ढिवर भोई हा समाज दिवस भर मासेमारी करून संध्याकाळ ला मासे विकून आपला उदरनिर्वाह चालवत असे . परंतु सकाळ च्या अटी मुळे ते मासोळी विकू शकत नाही. शहरा मध्ये मासोळी बर्फा मध्ये ठेवून सकाळी विकता येते परंतु तालुका स्तरावर व गावपातळी वर बर्फ मिळत नाही किंवा बर्फात ठेवून विकण्या लायक मासोळी राहत नाही . गरीब ढिवर भोई संध्याकाळी ५० -१०० रुपया ची मासोळी विकून आपला उदरनिर्वाह चालवत असते . तरी येणाऱ्या १५ दिवसाच्या लॉकडाउन मध्ये महाराष्ट्र शासनाने संध्याकाळी ४-६ या व वेळेस मासोळी विकायची परवानगी द्यावी अशी विनंती चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. राजेश डहारे यांनी केलेली आहे .