chandrapur I ‘काश, मास्क ठिक से पहना होता’

काश, मास्क ठिक से पहना होता’

कोरोनाविषयक जागृती मोहिमेचा प्रारंभ

नागपूर, दि. 28 : कोरोनापासून वाचायचे असेल तर मास्क घालणे अत्यावश्यक आहे. एक छोटीशी मुखपट्टी (मास्क) कोणाचातरी जगण्याचा आधार, कोणाचेतरी छत्र हिरावण्यापासून वाचवू शकते. परंतु नागरिकांमध्ये असलेली बेफिकरीमुळे अनेकांना आपले प्राणसुध्दा गमवावे लागले आहेत. कोरोनाला दूर ठेवायचे असेल तर मास्कची आवश्यकता सर्वसामान्य नागरिकांना कळावे यासाठी ज्येष्ठ छायाचित्रकार व कलावंत विवेक रानडे यांच्या कल्पकतेतून जनजागृती मोहीम साकारली आहे. या विशेष मोहिमेचा शुभारंभ विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते झाला.

कॅलामेटी रिसपॉन्स ग्रुप नागपूर व माहिती व जनसंपर्क विभाग हे संयुक्तपणे कलात्मक कोरोनाविषयक जाहिरात मोहीम राबविणार आहे. या मोहिमेला जिल्हा प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य मिळणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात एक छोटेखानी कार्यक्रमात कोरोनाविषयक जनजागृती मोहिमेची सुरुवात झाली. यावेळी विवेक रानडे, अमित पंचेमेतीया, माहिती संचालक हेमराज बागुल, माध्यम समन्वयक अनिल गडेकर, दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राच्या उपसंचालक गौरी पंडीत-मराठे आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच मास्क घालणे, हात साबणाने स्वच्छ धुणे व सामाजिक अंतर पाडणे या त्रिसुत्रीचा अवलंब करण्याचे निर्देश आयसीएमआरने दिले होते. नागरिकांकडून मास्क न घालण्याबद्दल स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुध्दा सुरु केली आहे. परंतु मास्क न घालणे व घातला असल्यास व्यवस्थीत न घालणे याबद्दल बेफिकरीची वृत्ती सर्वत्र दिसून येत आहे. मास्क घातला तर आपले अमूल्य प्राण वाचू शकते या कल्पनेच्या आधारे विवेक रानडे यांनी कलात्मक जाहिरात मोहीम तयार केली आहे. ही माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावी यासाठी प्रशासनातर्फे पुढाकार घेण्यात आला आहे.

कोरोनामुळे आई, वडील, भाऊ, मित्र, आजी, आजोबा आदी आपतजन आपण गमावले आहे. कोरोना प्रतिबंधक नियमाचे आपण काटेकोर पालन केले असते तर या सर्वांचे प्राण वाचवू शकलो असतो. दुसऱ्या लाटेनंतर तरी आता जागृत होण्याची वेळ आली आहे. मुखपट्यांचा वापर करणे आवश्यक आहेच परंतु मुखपट्टी वापरताना ती केवळ दंडात्मक कारवाई होवू नये ऐवढयापुरतीच नसून कोरोनापासून संरक्षणासाठी आहे. याची जाणीव करुन देणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेची तिव्रता आदीच्या लाटेपेक्षा अधिक राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मुखपट्यांचा योग्य व शास्त्रोक्त करावा यासाठी ही मोहीम सुरु करण्यात आली आहे.

कोरोनापासून बचावासाठी मुखपट्टी हेच शस्त्र राहणार आहे. मुखपट्टी घाला नाही तर कोरोना होण्याचे प्रमाण वाढेल, आपले कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी मुखपट्टीचे महत्त्व या जागृती मोहिमेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर यांनी पुढाकार घेतला आहे.