chandrapur I ब्रम्हपुरी : शिवाजी महाराजांची जयंती  उत्साहात साजरी

ब्रम्हपुरी : शिवाजी महाराजांची जयंती  उत्साहात साजरी

शिवजयंतीचे औचित्य साधून कोरोना योध्यानचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून सत्कार

ब्रम्हपुरी तालुका शिवसेनेच्या वतीने ब्रम्हपुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रशासनाने दिलेल्या सुचनेचे पालन करून शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली.
शिवसेना विधानसभा संपर्क प्रमूख संजय काळे साहेब व जिल्हा प्रमुख नितीनभाऊ मत्ते यांच्या मार्गदर्शनात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे जास्त गर्दी न करता दरवर्षी प्रमाणे शिवजयंती मिरवणूक न काढता कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या सर्व कर्मचारी अधिकारी,सफाई कामगार,डॉक्टर्स,नर्स, पोलीस
कर्मचारी यांचं सत्कार करण्याचा
कार्यक्रम घेण्यात आला.दिनांक 31/3/2021 ला शासकीय रुग्णालय ब्रम्हपुरी येथे कोरोनाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनात काम करणाऱ्या डॉक्टर्स,नर्स,आरोग्य कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला दिनांक 1/4/2021ला नगर परिषद मधील सफाई कामगार यांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमात आमंत्रित पाहुणे म्हणून नगरसेवक दीपक शुक्ला, नगरसेवक मनोज वठे, नगरसेवक सागर आमले,नगरसेवक महेश भर्रे उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी आपल्या मनोगत व्यक्त केल्या व कोरोना मध्ये दिवसरात्र काम करणारे नगर परिषद मधील आरोग्य अधिकारी ठोंबरे साहेब व यांच्या मार्गदर्शनात काम करणारे सर्व सफाई कामगार यांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच ब्रम्हपुरी शिवसेनेच्या वतीने गरीब गरजू लोकांना राशन किट पासून तर जेवणाच्या व्यवस्था करून देणारे दिवसरात्र मदतीला धावून जाणारे नगरसेवक दीपक शुक्ला यांचाही शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या वर्षीच्या शिवजयंती कोणताही गाजा वाजा न करता आलेल्या परिस्थितीची जाणीव ठेवून
जनसामान्य लोकांची काळजी घेणारे स्वतःच्या जीव धोक्यात टाकून आम्हाला कोरोनाची लागण होणार याची पर्वा न करता
आपले कर्तव्य समजून काम करणाऱ्या अशा या योध्यानचा सत्कार करून शहर प्रमुख नरू नरड यांच्या पुढाकाराने एक अनोखी शिवजयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे आभार माजी तालुका प्रमुख नरेंद्र गाडगीलवार यांनी केले या कार्यक्रमात उपस्थित
माजी शहर प्रमुख किशोर चौधरी,श्यामा भाणारकर ,खुर्शीद शेख, मिलिंद भणारे, पराग माटे,युवा सेना तालुका प्रमुख आकाश शेंद्रे,युवा सेना शहर प्रमुख अमोल माकोडे,आशिष गाडलेवार,प्रशांत साहारे ,महिला उपजिल्हा संघटिका वीणाताई घोडपागे,तालुका संघटिका जयाताई कन्नके,सुरेखाताई पारधी,अमोल ठिकरे,चेतन गुणजेकर,निकेतन गुणजेकर तसेच सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.