मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारीच्या ‘छापा काटा’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर!

मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारीच्या ‘छापा काटा’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर!

मुंबई: अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी ते मराठीतले अनेक तगडे स्टार असणारा अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात जोरदार धमाका उडवला होता. ‘छापा काटा’ चित्रपटाचा १९ जानेवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास या अस्सल मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा या चित्रपटाच्या मनोरंजनाचा विलक्षण अनुभव मिळणार आहे.

चित्रपटाची निर्मिती श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केली आहे. अभय जोधपुरकर, आर्या आंबेकर, सुनिधि चौहान आणि आदर्श शिंदे यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजातील गीतांने प्रेम, भावना आणि उत्साहाचा जबरदस्त संगम जुळून आला आहे. चित्रपटातील या सुमधुर गीतांना सुप्रसिद्ध संगीतकार मुकेश काशीकर आणि गौरव चाटी यांनी आपल्या संगीत कौशल्याने संगीतबद्ध असून गाण्यांना रसिक प्रेक्षकांचा संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

लोकांना वेड्यात काढून पॉलिसी विकणारा करामती नाम्या बहिणीच्या लग्नासाठी श्रीमंत शनयाशी लग्नाचा करार करतो खरा, पण हा नकली लग्नाचा करार नाम्या आणि शनायाच्या कुटुंबात काय धमाल विनोदी गोंधळ घालणार आणि त्या कराराचं पुढे काय होणार हे चित्रपटात पहायला मिळणार आहे. नाम्या म्हणजेच मकरंद अनासपूरे आणि श्रीमंत मुलगी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी असून मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर या सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या विनोदाचा डबल धमाल चित्रपटात पहायला मिळणार आहे.

“मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांच्या जोडीला कायमच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद असून त्यांच्या विलक्षण जोडीचा हा सहावा चित्रपट आहे. सहकुटुंब मनसोक्त आनंद घ्यावा असा ‘छापा काटा’ प्रेक्षकांना सुपूर्त करताना आनंद होत आहेच, त्याबरोबर प्रेक्षकांचा प्रतिसाद जाणून घेण्याची उत्सुकता आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies