लसीकरण पूर्ण झालेल्या 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक, गरोदर स्त्रियांना धार्मिक-प्रार्थना स्थळांना भेट देण्याची मुभा

लसीकरण पूर्ण झालेल्या 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक, गरोदर स्त्रियांना धार्मिक-प्रार्थना स्थळांना भेट देण्याची मुभा

चंद्रपूर,दि. 1 डिसेंबर : ज्या 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक, गरोदर स्त्रियांचे कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे व लसीकरणाच्या दुसऱ्या मात्रेनंतर 14 दिवस पूर्ण झाले आहेत. अशा 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व गरोदर स्त्रियांना धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळांना भेट देण्याची मुभा देण्यात येत आहे, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे

धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळांच्या क्षेत्रात प्रवेश करतांना मास्क घालणे, शारीरिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे किंवा रोगाणूरोधक यंत्र अनिवार्य असेल. याशिवाय कोविड-19 च्या फैलावास प्रतिबंध करण्यासाठी दिलेल्या अटी व शर्ती लागू राहतील. तसेच कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी शारीरिक अंतर राखणे व खबरदारी याबाबतच्या सर्व निकषांचे पालन करणे आवश्यक राहील.

सदर आदेश संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि. 26 नोव्हेंबर 2021 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील. असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी त्यांच्या आदेशात नमूद केले आहे.