आदर्श आचारसंहीतेबाबत कर्मचा-यांचे प्रशिक्षण

आदर्श आचारसंहीतेबाबत कर्मचा-यांचे प्रशिक्षण     

           भंडारा दि.9 :जिल्हयात लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने कर्मचारी प्रशिक्षणाचा शुभारंभ  कालपासून करण्यात आला आहे.आजच्या प्रशिक्षण सत्रात आज कम्युनिकेशन प्लान,  क्षेत्रीय स्तरावरील कार्यरत कर्मचा-यांचे प्रशिक्षण प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचे कार्य व निवडणुक आयोगाचे नियम, मतदान केंद्र व आदर्श आचारसंहिता ह्या विषयावर उपजिल्हाधिकारी श्रीमती लीना फलके यांनी प्रशिक्षण घेतले.त्यानंतर प्रशिक्षणातील मुददयांवर चर्चा करण्यात आली.

            जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, भंडारा यांच्या निर्देशानुसार नियोजन भवन, भंडारा येथे जिल्हयातील 60-तुमसर, 61-भंडारा व 62-साकोली या तिनही विधानसभा मतदार संघातील अधिकारी –कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे.यानुसार श्रीमती फलके यांनी प्रशिक्षण सत्राचे नियोजन केले आहे.

आज सकाळी जिल्हाधिका-यांनी नोडल अधिका-यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला.

            काल भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, व्हिडीओ चित्रीकरण पथक, व्हीडीओ निरीक्षण पथक तसेच निवडणूक खर्च नियंत्रण समिती पथक जिल्हास्तर, तालुकास्तर या विविध पथकाचे  प्रशिक्षण देण्यात आले.तर येत्या 13 तारखेला पेड न्युज व एमसीएमसी विषयक विषयांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.