नाभिक युवा महिला आघाडी ब्रम्हपुरी च्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती उत्सव साजरा.

नाभिक युवा महिला आघाडी ब्रम्हपुरी च्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती उत्सव साजरा.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांनी तत्कालीन समाजाला सामाजिक क्रांतीची नवी दृष्टी दिली. त्यांनी पुरोगामी महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली. महिलांसाठी शिक्षणाचे खरे काम फुले दाम्पत्याने केले. त्याचा गौरव ब्रिटिश सरकारनेही केला.
क्रांतिज्योतींचा समता व समानतेचा मंत्रच देशाला वाचवू शकतो. असे मत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या अनीताताई वनस्कर जि.प. शिक्षीका यांनी व्यक्त केले. ब्रम्हपरी येथे शनिवारी नाभिक युवा महिला आघाडी ब्रम्हपुरी च्या वतीने आयोजित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त बोलत होते. यावेळी मंचावर नाभिक युवा आघाडी चे अध्यक्ष लक्ष्मीकांत फुलबांधे, नाभिक युवा महिला आघाडी ब्रम्हपुरी च्या अध्यक्ष रजनीताई सुर्यवंशी, उपाध्यक्ष शालुताई फुलबांधे, सचिव रश्मीताई पगाडे, पितांबरभाऊ फुलबांधे, घनश्याम सुर्यवंशी,सोमेश्वर दाने व संपूर्ण नाभिक युवा आघाडी चे पदाधिकारी उपस्थित होते.
.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करीत सावित्रीबाई फुले यांच्या जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुर्यवंशी मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्चना फुलबांधे यांनी केले.कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी सुरेखा लांजेवार,मालीनी लांजेवार,नमीता खळशिंगे व आदी महीला गण उपस्थित होते.