chandrapur I राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

औष्णिक विद्युत केंद्राची करतील पाहणी

चंद्रपूर दि. 24 एप्रिल: राज्याचे नगर विकास,ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

रविवार दि. 25 एप्रिल 2021 रोजी,सायंकाळी 5:00 वाजता खापरखेडा जि. नागपूर येथून चंद्रपूर कडे प्रयाण करतील. रात्री 8:00 वाजता औष्णिक विद्युत केंद्र, चंद्रपूर येथे आगमन व मुक्काम राहतील.

सोमवार दि. 26 एप्रिल 2021 रोजी, सकाळी 8:30 वाजता औष्णिक विद्युत केंद्र, चंद्रपूर येथे पाहणी करतील. सकाळी 10:00 वाजता चंद्रपूर येथून राहुरी जि.अहमदनगर कडे प्रयाण करतील.