अपघात मुक्त ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी पोलीसांना दिलेल्या सहकार्याबद्दल सर्व नागरीकांचे  आभार – पोलिस अधीक्षक चंद्रपूर 

अपघात मुक्त ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी पोलीसांना दिलेल्या सहकार्याबद्दल सर्व नागरीकांचे  आभार – पोलिस अधीक्षक चंद्रपूर 

दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी वर्ष समाप्ती व नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने साजरा व्हावा, सर्वाचा सण आनंदान पार पाडण्यासाठी, रस्त्यावर कोणी दंगा मस्ती करु नये, रस्त्यावर मद्यप्राशन करुन वाहन चालविल्यामुळे गंभीर/प्राणांतिक अपघात होवु नये म्हणुन चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने बंदोबस्ताची जय्यत तयारी करुन जिल्हयातील प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी तसेच विविध हॉटेल/रेसार्ट/पर्यटन / मनोरंजनाचे ठिकाणी आणि जाणे-येण्याचे रस्ते या ठिकाणी चोख बंदोबस्त पहाटे पर्यंत ठेवला होता आणि वरिष्ठ अधिकारी पहाटे पर्यत जागरत करुन फिरत होते आणि बंदोबस्तावरील पोलीस अंमलदारांना प्रोत्साहित करीत होते, ज्यामुळे 31 डिसेंबर चा बंदोबस्त हा दिसता व सजग होता. यासाठी चंद्रपूर पोलीसांनी मागील 3 दिवसापासुन ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची विशेष मोहीम हातात घेवुन परिणामकारक कारवाई केली असुन या सगळयाचा परिणाम म्हणुन 31 डिसेंबरच्या रात्री एकही गंभीर अपघात न होता, 31 डिसेंबर आनंदात व हषोउल्लासाने साजरा होवुन नववर्षाचे स्वागत झाले. पोलीस अंमलदार ते पोलीस अधीक्षक हे सर्व जनतेच्या नववर्षाच्या आनंदात कुठला विरजन पडु नये याची जातीने खात्री करीत होते. पोलीसांच्या सजग उपस्थितीत 31 डिसेंबर अत्यंत खेळीमेळीने साजरा झाला रस्त्यावर कुठेच दंगा मस्ती नव्हती त्याबद्दल नागरीकांनी पोलीसांच्या सुचनेचे पालन केल्यामुळे सर्व नागरीकांचे पोलीस अधिक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी व समस्त चंद्रपूर जिल्हा पोलीसांनी आभार मानले आहे.