chandrapur I हॉटेलच्या आतील आवारामध्ये असलेले रेस्टॉरंट वगळता सर्व रेस्टॉरंट बंद राहतील.

हॉटेलच्या आतील आवारामध्ये असलेले रेस्टॉरंट वगळता सर्व रेस्टॉरंट बंद राहतील.

सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी ७.०० ते रात्री ८.०० या वेळेमध्ये पार्सल सुविधा/ घरपोच सेवा / टेक अवे सुविधा या सुरू राहतील. शनिवार व रविवार या दिवशी फक्त घरपोच पार्सल सेवा सकाळी ७.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत सुरू राहतील. आणि कोणत्याही नागरिकांस या सेवा घेण्यासाठी कोणत्याही रेस्टॉरंट आणि बार या ठिकाणी जाता येणार नाही. हॉटेलमध्ये उतरलेल्या प्रवाशांसाठी फक्त हॉटेलमधील रेस्टॉरंट सुरू राहतील. कोणत्याही परिस्थितीत बाहेरील प्रवाशांसाठी या सेवेचा लाभ देता येणार नाही. बाहेरील प्रवाशांसाठी वर नमूद केलेले रेस्टॉरंटसाठी प्रतिबंधाचे पालन केले जाईल. भारत सरकारकडील निर्देशानुसार घरपोच सेवेशी संबंधित कामगार वर्गाचे लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करावे, लसीकरण झालेले नसल्यास सर्वानी १५ दिवसांसाठी वैध असलेले कोरोनाचे निगेटीव्ह प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील. सदरचा नियम १० एप्रिल, २०२१ पासून लागू होईल. आरटीपीसीआर टेस्ट प्रमाणपत्र किंवा लसीकरण केलेले नाही अशा कामगार वर्गाने घरपोच सेवा दिल्यास त्यांना १० एप्रिल, २०२१ पासून सदर नियमाचा भंग केल्या बद्दल रक्कम रुपये १०००/- दंड आणि

संबंधित आस्थापनेकडून रक्कम रूपये १०,०००/- दंड आकारला जाईल. भारत सरकारकडील निर्देशानुसार रेस्टॉरंट आस्थापनामध्ये काम करणारे व्यक्ती / कामगार वर्ग या सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करावे, जेणेकरून कोव्हीड -१९ विषाणू संसर्गाची भिती न बाळगता, शासनास रेस्टॉरंट सुरू करणेबाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल. या साठी सहकार्य करावे