कृषि विज्ञान केंद्र, गडचिरोली मार्फत खरीप हंगाम पुर्व शेतकरी कार्यशाळा संपन्न

कृषि विज्ञान केंद्र, गडचिरोली मार्फत खरीप हंगाम पुर्व शेतकरी कार्यशाळा संपन्न

कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली अंतर्गत खरीप हंगामपूर्व कार्यशाळेचे आयोजन दिनांक ३१.०५. २०२३ रोजी मौजा दुधमाळा ता. धानोरा येथे आयोजन करण्यात आले.

सदर खरीप विज्ञान पूर्व कार्यशाळा कार्यक्रम कृषी केंद्र, सोनापूर-गडचिरोली येथील डॉ. पी. एन. चिरे, विषय तज्ञ (कृषिविद्या), श्री. पी. ए. बोथीकर, विषय तज्ञ (पिक संरक्षण), श्री. डी. दृश्य ताथोड, विषय तज्ञ (कृषि अभियांत्रिकी), श्री. एन. पी. बुधेवार, विषय तज्ञ (कृषि तंत्रशास्त्र), श्री. यशवंत प्रभुजी मोहर्ले, उपसरपंच, दुधमाळा, श्री. राजेश उदके, प्रगतशील शेतकरी तसेच दुधमाळा येथील शेतकरी उपस्थित होते.

डॉ. पी. एन. चिरडे, विषय विशेषज्ञ (कृषिविद्या) ह्यांनी खरीप हंगाम पुर्व तयारी करण्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच धान पिक लागवड तंत्रज्ञान उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितले. खरीप हंगामाकरीता सुधारीत वाणांचा वापर करून शेती केल्यास अधिक उत्पादन मिळू शकते असे प्रतिपादन केले. त्याचप्रमाणे माती परिक्षण, नैसर्गीक शेती, दशपर्णी अर्क विषयी सखोल मार्गदर्शन केले.

श्री. पी. ए. बोथीकर, विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण) ह्यांनी खरीप हंगामामध्ये धान पिकावर येणारी किड, रोग व्यवस्थापन, पिकाची घ्यावयाची काळजी विषयी मार्गदर्शन केले. धान पिकावर येणारे करपा, कडा करपा, तुडतुडा तसेच विविध किड रोगाची लक्षणे सांगून व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले.

श्री. डी.व्ही. ताथोड, विषय विशेषज्ञ (कृषि अभियांत्रिकी) ह्यांनी कृषि यांत्रिकीरण विषयक सखोल मार्गदर्शन केले. कमी वेळात आणि कमी खर्चामध्ये अधिक उत्पादनाकरीता कृषि यांत्रिकीणाव्दारे शेती करणे सहज शक्य होते असे प्रतिपादन केले. त्याचप्रमाणे धान पेरणी यंत्राचे प्रात्यक्षिक उपस्थित शेतकऱ्यांना करून दाखविले.

श्री. एन. पी. बुध्देवार, विषय विशेषज्ञ (कृषि हवामानशास्त्र) ह्यांनी हवामान आधारीत धान पिक लागवड तंत्रज्ञान विषयी मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांनी “श्री” व पट्टा पध्दतीने धान पिकाची लागवड करावी असे प्रतिपादन केले. हवामानानुसार पिकाची लागवड करून आपले आर्थिक स्तर उंचवावे असे प्रतिपादन केले.

सदर खरीप हंगामपूर्व कार्यशाळा कार्यक्रमास शेतकरी बंधु-भगिनीं उपस्थित होते.