chandrapur I अत्यावश्यक सेवेमध्ये या गोष्टीचा समावेश असेल…

अत्यावश्यक सेवेमध्ये या गोष्टीचा समावेश असेल…

रुग्णालय, रोग निदान केंद्र, क्लिनिक्स, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा. किराणा सामान दुकाने, भाजीपाली दुकाने, दुध डेअरी, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था जसेकी, रेल्वे, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक बसेस. विविध देशांच्या परराष्ट्र संबंध विषयक कार्यालयांच्या सेवा. स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सून पूर्व उपक्रम व सेवा. स्थानिक प्राधिकरणाव्दारे पुरविणेत येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा .मालाची / वस्तुंची वाहतुक, शेतीसंबधित सेवा, ई कॉमर्स, मान्यताप्राप्त वृत्तपत्र आणि त्यांच्याशी संबंधित सेवा,स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवा.