chandrapur I अखील भारतीय व्यवसाय परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र उपलब्ध

अखील भारतीय व्यवसाय परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र उपलब्ध

चंद्रपूर, दि. 26 मार्च : एप्रिल-2017, नोव्हेंबर-2017 व एप्रिल-2018 मध्ये शिकाऊ उमेदवारी अंतर्गत अखिल भारतीय व्यवसाय परिक्षेत बसून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे अंतिम प्रमाणपत्र उपलब्ध झाले आहेत. प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी संबंधित उमेदवारांनी प्रोव्हिजनल मार्कशीट, करारपत्राची प्रत तसेच प्रशिक्षण कालावधीमध्ये कंपनी/ आस्थापनेकडून मिळालेल्या स्टायपंडचा पुरावा म्हणून बॅक स्टेटमेंट अथवा बँक पासबुकाची झेरॉक्स कॉपी दोन प्रतीत मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, द्वारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर या कार्यालयात त्वरित जमा करण्यात यावे असे संस्थेचे अंशकालीन प्राचार्य यांनी कळविले आहे.