शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश धनगर  विद्यार्थ्याकरिता अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरु आहे.

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश धनगर  विद्यार्थ्याकरिता अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरु आहे.

            भंडारा, दि.12:  धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी सन 2023-24 तसेच 12 वी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंदिभूत प्रवेश प्रक्रियाद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतू शासकिय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनकरीता पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

             तरी पंडीत दीनदयाल उपाध्यय स्वंयम स्वाधार धनगर समाजातील विद्यार्थ्यांचे खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करावी, धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख  यांनी केले आहे.

 पात्रतेचे निकष

         विद्यार्थी बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेत असावा व किमान 60 टक्के गुण प्राप्त असावे. केंद्र शासनाच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल. तथापी दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, वैद्यकीय परिषद, फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्थामार्फत मान्यता प्राप्त महाविद्यालय, संस्थेमध्ये मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांस प्रवेश मिळालेला असावा.

          योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांने बारावी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेव्दारे प्रवेश घेतलेला असावा.