थोर संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती  साजरी 

थोर संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती  साजरी 

तेली समाजाचे आराध्य दैवत मानवतेची शिकवण देणारे थोर संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती प्रभाग क्रमांक 13 भरडकर मोहोल्ला सिंदेवाही येथे जयंती उत्साव उत्साहात साजरी करण्यात आली . उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते संताजीच्या प्रतिमेस माल्याअर्पणआणि दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून रघुनाथजी शेंडे, प्रमुख पाहुणे घुगस्कर सर,प्रा. डॉ वरभे सर, डूबराज ठाकरे , गंडाटेजी, करकाडे , तेली समजातील युवा कार्यकर्ते होते. या कार्यक्रमात सहभागी समाज बांधव सोमाजी भरडकर, देवरावजी ठाकरे, नामदेवजी ठाकरे ,संदीप भरडकर सर , कावडे सर,दुधारामजी ठाकरे , महीला शुभागी शेंडे,आशा गंडाटे, छबूताई नागोसे , रजनी भरडकर, सुशिलाताई भरडकर, छबूताई नागोसे , सिंधुताई समर्थ आणि संपूर्ण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जागृती युवराज ठाकरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी सर्व समाज बांधवांचे सहकार्य लाभले.