chandrapur I पोलिसांच्या जागृततेन मोठा अपघात टळला.

chandrapur I पोलिसांच्या जागृततेन मोठा अपघात टळला.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात असलेले तळोदी बाळापूर हे गाव नागपूर चंद्रपूर महामार्गावरती असून आज मोठा. अपघाती नुसकान पोलिसांच्या दक्षतेमुळे टळला.

आज नागपूर वरून मुल ते आलापल्ली असा वाहतूक करणारा ट्रक त्यात दुकान व्यवसायिकांची अनेक सामान घेऊन जात असनारा ट्रक च्या वरून आगीचा धूर निघत होता असं तळोदी पोलिसांच्या लक्षात येताचं त्यांनी ट्रक चालकाचा पाठलाग करुन ट्रक थांबून तपासणी केली असता हळूहळू आगीचा धूर निघत होता. लगेच पोलिसांनी ट्रकला रस्त्याच्या बाजूला लावत आग कशी विजवता येईल यासाठी प्रयत्न सुरू असतानाच आगीने मोठा भडका घेतला व त्यामुळे आग विजवणे शक्य होत नसल्यामुळे जेसीपी च्या साह्याने ट्रकला फलटवुण ट्रक मधले सर्व साहित्य बाहेर काढून आग नियंत्रणात आणली.
त्यानंतर परत ट्रक ला सरळ करण्यात आले.
यामध्ये स्थानिक लोकांची मोठ्या प्रमाणात मदत मिळाली.
ट्रकवरुन धुर निघण्याचा प्रकार पोलिसांच्या वेळीच लक्षात आल्यामुळे व्यावसायिकांचे व वाहनांचे करोडो रुपयांचे नुसकान होता होता वाचले.

पोलिसांच्या चांगल्या कर्तृत्वामुळे जिल्हाभर लोकांकडून कौतुक केल जात आहे.