chandrapur I 26 रोजी डाक अदालतचे आयोजन

26 रोजी डाक अदालतचे आयोजन

चंद्रपूर, दि. 17 एप्रिल : जिल्ह्यात डाक सेवा ही देशाच्या सामाजिक–आर्थिक जीवनाचे अभिन्न अंग आहे, आणि वस्तूता प्रत्येक नागरिकांच्या जीवनाला प्रभावित करतात डाक विभाग आपल्या ग्राहकांना पूर्ण समाधान प्रदान करण्यासाठी तत्पर आहे. कधीकधी तक्रारी सुध्दा उत्पन होतात या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी वेळोवेळी डाक अदालतचे आयोजन करण्यात येत असते याकरिता प्रवर अधिक्षक, डाकघर, चांदा विभाग चंद्रपूरच्या वतीने 26 एप्रिल रोजी सोमवारी प्रवर अधिक्षक डाकघर, चांदा विभाग, चंद्रपूरच्या कार्यालयात डाक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्या व्यक्तीने डाक सेवा संबंधात आपल्या तक्रारी दोन प्रतीमध्ये प्रवर अधिक्षक डाकघर चांदा संभाग,चंद्रपूर 442401 या पत्यावर 20 एप्रिलपर्यत पाठवावे असे आवाहन प्रवर डाक अधिक्षक, चंद्रपूर यांनी कळविले आहे.