महापौर राखी संजय कंचर्लावार यांची शुक्रवारी आकाशवाणीवर मुलाखत

महापौर राखी संजय कंचर्लावार यांची शुक्रवारी आकाशवाणीवर मुलाखत

चंद्रपूर, ता. १६ : देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी आकाशवाणीवर केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या ‘गौरवगाथा’ या मालिकेचे प्रसारण करण्यात येत आहे. यात शुक्रवार ता. १७ रोजी सकाळी ९.४५ ते १० वाजेपर्यत चंद्रपूर शहराच्या महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांची विशेष मुलाखत चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित होणार आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या उत्थानासाठी विविध प्रकल्प हाती घेतले. शहराचा विकास करण्यासाठी स्मार्ट सिटी सारखा उपक्रम सुरु केला. त्यांचा महत्वाकांक्षी असलेला अमृत योजना प्रकल्प आता अंतिम टप्यात आलाय. यात चंद्रपूर शहर देखील आहे. यानिमित्त महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्याशी आकाशवाणीच्या निवेदिका ऐश्वर्या भालेराव बातचीत करणार आहेत.