प्रधानमंत्री पीक विमा योजना
रब्बी हंगाम 2026-27 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.
पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणेसाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात उत्पादनावर आधारीत सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2026 व रब्बी हंगाम 2026-27 या 1 वर्षाकरीता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, रब्बी मका, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमुग व रब्बी कांदा ( ७ पिके ) या अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल मंडळ/ क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल.
सदर योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) करिता दिनांक 30 नोव्हेंबर,२०२6 , गहु (बागायत), हरभरा, रब्बी मका व रब्बी कांदा या पिकाकरिता दिनांक 15 डिसेंबर,२०२6 व उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग या पिकाकरिता दिनांक 31 मार्च,२०२7 अशी आहे. त्यासाठीचे PMFBY पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.
कर्जदार शेतक-यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरुन देणे आवश्यक आहे. जर कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होणार नसेल तर तसे त्याने नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी कर्ज मंजूर करणा-या बँकेस लेखी कळविणे आवश्यक आहे.
त्यामुळे सर्व शेतक-यांना आवाहन करण्यात येते की, रब्बी हंगाम २०२6-२7 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे पोर्टल https://pmfby.gov.in वर स्वत: शेतकरी यांनी तसेच बँक, विमा कंपनीने नियुक्त केलेले एजेंट, क्रॉप इंन्शुरन्स ॲप व सामुहिक सेवा केंद्र (CSC) यांचे मार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी तात्काळ आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार/तालुका कृषि अधिकारी, जिल्हाधिकारी/जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी यांचेशी संपर्क साधावा.
योजना कार्यान्वयीन यंत्रणा :









