विद्युत अल्युमिनियम तार चोरी चा गुन्हा उघड ३ आरोपी अटक, चोरीची मालमत्ता जप्त पोस्टे धाबा ची कारवाई

विद्युत अल्युमिनियम तार चोरी चा गुन्हा उघड ३ आरोपी अटक, चोरीची मालमत्ता जप्त पोस्टे धाबा ची कारवाई

उप पो.स्टे. धाबा हदृदीतील मौजा गोडंपिपरी ते टोमटा येथे ११ के. व्ही. टोमटा एरिकेशन विदयुत लाईन गेलेली असुन सदर विदयुत पोलवरील अॅल्युमिनीयम तार दिनांक २९/०७/२०२५ रोजी रात्री ००.०० ते ०३.०० वा दरम्यान कोणतीरी अज्ञात चोराने ३०० मीटर डॉग कंडक्टर किंमत ७० /- रू मिटर प्रमाणे एकुण किंमत २१,००० /- ची तार तोडुन चोरून नेल्याबाबत उप पोस्टे धाबा येथे फिर्यादी नामे साईनाथ अशोक लांडे वय २९ वर्षे व्यवसाय नौकरी (कनिष्ठ अभियंता धाबा महावितरण) रा. धाबा यांचे तक्रारीवरून अप क्र.४५/२०२५ कलम ३०३(२) बी.एन.एस. अन्वये गुन्हा नोंद असुन धाबा पोलीसांनी गुन्हयात विपुल कुळमेथे, संदेश कोवे, निलेश सातपुते यांना ताब्यात घेवुन त्यांना गुन्हयासंबधीत विचारपुस करुन गुन्हयातील चोरीस गेलेली ०४ नग विद्युत तार किंमत २१,००० /- रूपये तसेच गुन्हयात वापरलेली बजाज पल्सर मोटर सायकल क्रमांक एम.एच. ३४ सी एच ५३९१ किंमत ७०,००० /- रूपये असा एकुण ९१,००० चा मु‌द्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपास धाबा पोलीस करीत आहे.

सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक श्री ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात सपोनि धर्मेन्द्र मडावी ठाणेदार उप पोस्टे धाबा यांचे नेत्त्वात पोहवा विजय मडावी, पोअ / श्रवण कुत्तरमारे, अमोल कुळमेथे, पोअ/गजानन तुरेकर, चापोहवा / चंद्रशेखर आसुटकर यांनी केली आहे.