हत्तीरोग विकृती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

हत्तीरोग विकृती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

गडचिरोली, दि.09:राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हत्तीरोग रुग्ण यांची देखभाल व काळजी बाबत विकृती व्यवस्थापन प्रतिबंध प्रशिक्षण दिनांक 7 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर गडचिरोली येथे संपन्न झाली.

या कार्यशाळेला जिल्हाधिकारी संजय मीणा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, कुमार आशीर्वाद यांनी हत्तीरोग रुग्याबाबत माहिती दिली. वैद्यकीय अधिक्षक जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली, डॉ.किलनाके यांनी जिल्हयातील एकूण अंडवृध्दी रुग्णांचे विविध स्तरावर निदान व शस्त्रक्रिया करुन उपचार करण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

जागतिक आरोग्य संघटना समन्वयक नागपूर या कार्यक्रमाला आर्वजून उपस्थित होत्या. त्यांनी जिल्हयातील हत्तीरोग विकृती व्यवस्थापन बाबत संगणकाच्या सहाय्याने कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हयातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिक्षक व तालुका आरोग्य अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी कार्यशाळेला उपस्थित होते.

हत्तीरोग अधिकारी डॉ.देवळीकर यांनीही मार्गदर्शन करुन जिल्हयातील हत्तीपाय रुग्णांना एम एम डी पी किट वितरीत करण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी सहायक संचालक,हिवताप नागपूर डॉ.निमगडे यांनी हत्तीरोगाबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेला जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.साळवे, जिल्हा शल्य चिकीत्सक, डॉ.अनिल रुडे, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.जठार, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.मडावी, माता बाल संगोपन अधिकारी, डॉ.बेले, जिल्हा हिवताप अधिकारी, डॉ.मोडक तसेच हिवताप व हत्तीरोग कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्रीमती अश्र्विनी धोडरे यांनी केले.