भंडारा-तुमसर-बालाघाट राज्य महामार्गावरील वाहतूक परावर्तित

भंडारा-तुमसर-बालाघाट राज्य महामार्गावरील वाहतूक परावर्तित

  • 27 सप्टेंबर ते 26 ऑक्टोंबर पर्यंत वाहतूक परावर्तित

भंडारा,दि.22:- साऊथ ईस्ट सेन्ट्रल रेल्वेच्या राजनांदगाव- कलमना तिसऱ्या लाईन प्रकल्पाच्या संदर्भात बॉक्स पुशिंग पध्दतीने भंडारा रेल्वे स्थानकाजवळ भंडारा-तुमसर-बालाघाट राज्य महामार्ग 271 वरील रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) क्र.89 सी चे बांधकाम 27 सप्टेंबर 2021 पासून सुरू होणार आहे. त्याअनुषंगाने भंडारा- तुमसर-बालाघाट राज्य महामार्ग 271 वरील वरठी (भंडारा) स्टेशनच्या नागपूर दिशेकडील रोड ओव्हर ब्रिज 27 सप्टेंबर ते 26 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत वाहतुकीस बंद राहील. या मार्गावरील वाहतूक एलसी क्र.540 भंडारा स्टेशन मोहाडी-भंडारा रोड, रोहा-मोहाडी रस्त्यावर एलसी क्रमांक 535 रोहा गेट व एलसी क्र. 542 सातोना-नेरी रोडवरील नेरी गेटव्दारे वळवली जाईल, असे रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.